Police patil Bharti 2023|”10 वी” पास असाल तर व्हा गावचा “पोलीस पाटील”

Police Patil bharti 2023 | महसूल व वन विभागामार्फत ता.मूल(चंद्रपूर) येथे “पोलीस पाटील” पदासाठी भरती होत आहे.

        Police Patil Recruitment 2023 | उपविभागीय अधिकारी ता.मूल जि.चंद्रपूर यांनी 10 पास असणाऱ्यांसाठी “पोलीस पाटील “ पदाच्या एकूण 56 जागांसाठी भरती बाबत जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. जे पात्र उमेदवार आहेत  त्यांनी सदर प्रसिद्ध जाहिरात  सविस्तर वाचून आपला अर्ज  सादर करावा. सदर पोलीस पाटील  भरती साठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 जून  2023 आहे.Police Patil bharti 2023 ची शैक्षणिक पात्रता,अभ्यासक्रम ,निवड प्रक्रिया,ठिकाण,वयाची अट ,पगार,अर्ज दाखल करण्याची पद्धत या बद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे .जाहिरातीत दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

Police Patil bharti 2023
Police Patil bharti 2023

                                              

Education Qualification for Police Patil Bharti 2023 

जाहिरात क्रमांक:- पत्र.क्र./क्र.कावी/अ.का./प्रस्तु-1/उवीद/2023/268 दि.30/05/2023

एकूण भरावयाची पदे :- 56

  • शैक्षणिक पात्रता :-
अ.क्र. पदाचे नाव शैषणिक पात्रता
1 पोलीस पाटील 10 थी पास

 

वयाची अट :- अर्जदाराचे वय दि.29/05/2023 रोजी कमीतकमी 25 वर्षे व जास्तीतजास्त 45 वर्षे असावे

  • पगार (वेतन) :- शाशकीय नियमानुसार

Exam Pattern for Police Patil Bharti 2023 :

  • परीक्षा पद्धत :-
पदाचे नाव परीक्षेचे स्वरूप
पोलीस पाटील लेखी परीक्षा (80 गुण) + तोंडी परीक्षा (20 गुण) एकूण 100 गुण

 

  •   त्यानुसार सदर लेखी व तोंडी परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे.
  • निगेटिव्ह मार्किंग : नाही 
  • वेळ : 2 तास

         परीक्षेचा दिनांक :-नंतर कळविण्यात येईल

  • अर्ज मिळण्याचे ठिकाण :- उपविभागीय अधिकारी कार्यालय,मूल

       अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन 

         अर्ज करण्याचा पत्ता :- आस्थापना शाखा,उपविभागीय अधिकारी कार्यालय,मूल जि.चंद्रपूर  

  • नियुक्तीचे ठिकाण : मूल तालुका जिल्हा-चंद्रपूर यांच्या कार्यक्षेत्रातील रिक्त गावात

  • परीक्षा शुल्क :- नाही         

 Syllabus for Police Patil Bharti 2023

  • लेखी परीक्षा 10 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल यात सामान्य ज्ञान ,गणित,पोलीस पाटील चे अधिकार व कर्तव्य ,स्थानिक परिसरातील माहिती व  चालू घडामोडी ई.विषयांचा समावेश असेल.

  • About chandrapur Police Patil Bharti 2023 भरती बाबत सर्वसाधारण सूचना

  पोलीस पाटील भरती, नियुक्ती ,कर्तव्य आणि कार्ये  याबाबत महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम,१९६७ लागू आहे.

  • 1. प्राप्त केलेल्या गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी अर्जदाराचे शैक्षणिक पात्रता व इतर संबंधित मुळ प्रमाणपत्र तपाणीसाठी मुलाखतीच्या दिवसी उपलब्ध करुन दयावी लागतील. अन्यथा तोंडी परिक्षेकरीता अर्जदाराचा विचार केला जाणार नाही.
  • 2. लेखी परिक्षा, तोंडी परिक्षा, कागदपत्रे छाननी, प्रवेशपत्र वेळापत्रक व विविध सुचना उपविभागीय अधिकारी कार्यालय, मूल, तहसिल कार्यालय, मूल / सावली येथे उपलब्ध करुन दिल्या जातील. भरती प्रक्रीयेतील माहिती / कार्यक्रमाबाबत अद्यावत व सजग राहण्याची तसेच प्रवेशपत्र प्राप्त करून घेण्याची जबाबदारी संपुर्णत: अर्जदाराची राहील.
  • 3. लेखी परीक्षेला पात्र ठरलेला उमेदवार मुलाखतीस हजर नसेल तर त्यास अपात्र ठरविण्यात येईल.
  • 4. अर्जदार शारिरीक दृष्टया सक्षम असल्याबाबतचे अधिक्षक ग्रामिण रुग्णालय यांचे अथवा वरिष्ठ वैद्यकीय अधिका-याचे प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील व अर्जदाराची पात्रता वैद्यकीय तपासणी अंतिच निश्चित करण्यात येईल.
  • 5. अर्जदाराचे चारीत्र निष्कलंक असल्याबाबतचे संबंधित पोलीस स्टेशनचे चारीत्र प्रमाणपत्र पडताळणीचे वेळी सादर करणे आवश्यक राहील.
  • 6. अर्जदाराचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसावा त्याचप्रमाणे तो ईतर ठिकाणी पुर्णवेळ नौकरी करणारा नसावा तसेच तो स्थानिक स्वराज्यसंस्थेचा खाजगी किंवा निमसरकारी संस्थेचा सदस्य नसावा याबाबतचे रुपये 100/- च्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र, कागदपत्र पडताळणीच्यावेळी सादर करणे आवश्यक राहील.
  • 7. अर्जदार स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे.
पोलीस पाटीलची महत्वाची कर्तव्य (महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम,१९६७ नुसार ) :-

जिल्हा दंडाधिकान्याच्या आदेशांस अधीन राहून पोलीस पाटील-.

  • (एक) त्याचे गाव ज्याच्या स्थानिक अधिकारितेत येत असेल अशा इतर कोणत्याही कार्यकारी दंडाधिकान्याच्या आदेशान्वये काम करील.
  • (दोन) असा कार्यकारी दंडाधिकारी जी कोणतीही विवरणे आणि माहिती मागवील, ती विवरणे व माहिती पुरवील.
  • (तीन) आपल्या गावातील अपराधांचे प्रमाण व ग्राम पोलिसांशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी याविषयी आणि गांवातील समाजाचे स्वास्थ्य व त्याच सर्वसाधारण परिस्थिती याविषयी अशा कार्यकारी दास नियमितपणे माहिती देईल. 
  • (चार) कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने आपली कर्तव्ये पार पाडण्याच्या कामी मदत मागितली असता अशा सर्व पोलीस अधिकाऱ्यांना त्याच्या अधिकारात असेल त्याप्रमाणे सर्व प्रकारची मदत देईल.
  • ( पाच ) दंडाधिकान्याकडून किंवा पोलीस अधिकाऱ्याकडून त्यास जे आदेश व अधिपत्रे देण्यात येतील त्या सर्व आदेशांचे व अधिपत्रांचे पालन व कार्यन्वयन तत्परतेने करील.
  • (सहा) सार्वजनिक शांततेस ज्या गोष्टीमुळे धोका पोहोचेल अशा गोष्टीविषयी गुप्तपणे माहिती गोळा करील व ती ठाणे अधिकान्यास कळवील.
  • (सात) आपल्या गावाच्या हद्दीत अपराध घडू नये म्हणून किंवा लोकांस उपद्रव होऊ नये म्हणून बंदोबस्त करील व आपल्या गावाच्या हद्दीतील गुन्हेगारांचा शोध करून त्यांना न्यायासनासमोर हजर करील.
  • (आठ) या अधिनियमाच्या इतर तरतुदींन्वये विनिर्दिष्ट करण्यात येतील आणि राज्य शासनाकडून या बाबतीत सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे वेळोवेळी विनिर्दिष्ट करण्यात येतील, अशी इतर कर्तव्ये पार पाडील.