Chandrapur Kotwal Bharti 2023| मूल(चंद्रपूर) येथे ४ थी पासवर “कोतवाल भरती”जाहिरात प्रसिद्ध

Chandrapur kotwal bharti 2023 | महसूल व वन विभागामार्फत ता.मूल(चंद्रपूर) येथे “कोतवाल” पदासाठी भरती होत आहे.

        Chandrapur kotwal Bharti 2023 | महसूल व वन विभागामार्फत ता.मूल जि.चंद्रपूर येथे ४ पास असणाऱ्यांसाठी “कोतवाल “ पदाच्या एकूण ०६ जागांसाठी भरती बाबत जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. जे पात्र उमेदवार आहेत  त्यांनी सदर प्रसिद्ध जाहिरात  सविस्तर वाचून आपला अर्ज  सादर करावा. सदर कोतवाल भरती साठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 07 जून  2023 आहे. Chandrapur kotwal bharti 2023 ची शैक्षणिक पात्रता,अभ्यासक्रम ,निवड प्रक्रिया,ठिकाण,वयाची अट ,पगार,अर्ज दाखल करण्याची पद्धत या बद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे .जाहिरातीत दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

                                               kotwal bharti 2023 maharashtra kotwal recruitment

जाहिरात क्रमांक:-क्र.कावी/अ.का./तलाठी आस्था/2023/114 दि.19/05/2023

एकूण भरावयाची पदे :- 06

 • शैक्षणिक पात्रता :-
अ.क्र. पदाचे नाव शैषणिक पात्रता
1 कोतवाल ४ थी पास

 

वयाची अट :-18 ते 40 वर्ष

 • पगार (वेतन) :- १५०००/-मानधन

 • परीक्षा पद्धत :- कोतवाल संवर्गाची पदे नामनिर्देशनाने भरतांना 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार. लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ ,  बहुपयायी स्वरुपाचे 50 प्रश्न असणार आहेत . त्यानुसार सदर लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे.
 • निगेटिव्ह मार्किंग : नाही 
 • वेळ : 2 तास

         परीक्षेचा दिनांक :-15 जून 2023

 • अर्ज करण्याची पद्धत :-जिल्हा निवड समिती ठरवणार

       अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन 

         अर्ज करण्याचा पत्ता :- आस्थापना शाखा,तहसिल कार्यालय मूल जि.चंद्रपूर  

 • नियुक्तीचे ठिकाण : मूल तालुका जिल्हा-चंद्रपूर यांच्या कार्यक्षेत्रातील “तलाठी कार्यालयत”

 • परीक्षा शुल्क :- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500/

                                   मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 300/-             

 •  अभ्यासक्रम :-  मराठी,गणित,सामान्य ज्ञान,चालू घडामोडी
 • चंद्रपूर कोतवाल भरती बाबत सविस्तर वेळापत्रक :-

 • 1. अर्ज स्विकारण्याची तारीख 24 में, 2023 ते शेवटची तारीख 07 जुन, 2023 रोजी सांयकाळी 6.15 वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळुन )
 • 2. अर्जाची छाननी दिनांक 08 जुन 2023 रोजी दुपारी 11.00 वाजेपासून तहसिल कार्यालय, मुल येथे करण्यात येईल. पात्र उमेदवारांनी यादीची प्रसिध्दी दिनांक 08 जुन, 2023 रोजी तहसिल कार्यालय, मुल यांचे नोटीय बोर्डावर लावण्यांत येईल.
 • 3. पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा गुरवार दिनांक 15 जुन, 2023 रोजी सकाळी 11.00 ते 12.00 वाजेपर्यंत कर्मवीर महाविद्यालय, मुल येथे घेण्यात येईल. सर्व पात्र उमेदवारांनी आपले अर्जाची पोचपावतीसह परिक्षेस उपस्थित रहाणे बंधनकारक आहे.
 • 4. सदर परिक्षेस आपणास कुठलेही पुस्तकी साहित्य, कॅल्क्युलेट, स्मार्ट वॉच, मोबाईल इत्यादी घेऊन बसता येणार नाही.
 • 5. उमेदवारांची निवड लेखी परिक्षा मिळालेले एकुण गुण लक्षात घेवुन गुणानुक्रमे करण्यात येईल.
 • kotwal bharti 2023 maharashtra kotwal recruitment
About chandrapur kotwal Bharti 2023 भरती बाबत सर्वसाधारण सूचना
  कोतवाल भरती, नियुक्ती ,कर्तव्य आणि कार्ये  याबाबत कोतवाल भरती व नेमणूक जनयम, १९५९ हे
नियम लागू आहेत.

1. कोतवाल म्हणजे  शासनाने नेमलेल्या अधिकाऱ्याकडून  वेळोवेळी ठरवून देण्यात येतील अशी कर्तव्य पार पडण्यासाठी गावात नेमलेला नोकर असा समजावा.

2. प्रत्येक गावातील कोतवालांची संख्या जिल्हाधिकारी ठरवतात.

3. कोतवालांचे मानधन शासन वेळोवेळी ठरवते.सध्या कोतवालाला र रु १५०००/- एवढे मानधन देण्यात येते.

4. कोतवालाची नियुक्ती  पहिल्या सहा महिन्यांसाठी अस्थायी /तात्यापुरत्या तत्वावर  केली जाते  तसेच या काळात कोणतीही पूर्वसूचना  व कारण न देता त्यांची  सेवा समाप्त केली जाऊ शकते.

5. कोतवालास, नियमात तरतूद केलेल्या व्यतिरिक्त  शासकीय नोकरास मिळणाऱ्या  सेवानिवृत्ती, वेतन, ग्रॅच्यइटी, रजा ई.लाभ नसतात.

6.  कोतवाल हा पूर्ण वेळ काम  करणारा शासकीय नोकर समजला जातो.

.7. कोतवाल पदासाठीचा उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा. जरूर तर तसा वैद्यकीय दाखला द्यावा लागतो.

8. कोतवाल पदासाठीचा उमेदवार,  ज्या  गावात त्याची  नेमणूक करावयाची आहे तो त्या तालुक्यात  राहाणारा असावा.  त्याबाबत सक्षम अधिकारी यांचा दाखला  सादर करणे आवश्यक असेल.

9. कोतवाल  पदासाठीच्या  उमेदवाराची  वर्तवणूक  चांगली असावी. पोलीस  ठाण्यातून त्याने  तसा दाखला आणणे आवश्यक असेल.

10. कोतवाल पदासाठी नेमणूक करण्याचे  अधिकार , शासनाच्या आदेशाला अधीन  राहून  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेखाली तहसिलदार यांना आहे.

कोतवालाची महत्वाची कर्तव्य :-

१. शासकीय रक्कम शासकीय तिजोरीत  भरण्यात तलाठी यांना सहाय्य करणे.
२. शेतसारा, शासकीय देणे अदा करण्यासाठी गावकरी  यांना तलाठी चावडीवर बोलावन आणणे.
३. शासकीय पैसा, कायाालयीन कागदपत्रे ने आण शासकीय वसली म्हणून जप्त केलेल्या मालमत्तेवर लक्ष ठेवणे.
४. आवश्यकतेनूसार गाव दप्तर गावातून वरिष्ठ कार्यालयात नेणे.
५. शासकीय  अधिकारी  यांना त्यांच्या दौर्यात, पीक पाहणीत, हद्दीच्या खुणा  तपासण्यात सहाय्य करणे.
६. नोटीस/ समन्स बजावणे व नोटीस/ समन्स बजावण्यासाठी पोलीस पाटलास मदत करणे.

kotwal bharati 2023 maharashtra kotwal recruitment

७. गावातील जन्म, मृत्यू, लग्न , मृत्यूची माहिती ग्रामसेवकास देणे.
८. पोलीस पाटील आजण पोलीसांना रात्रीच्या गस्तीसाठी मदत करणे. संशयास्पद प्रकरणांची  माहिती  पोलीस पाटलास देणे.
९. बेवारस मृतदेहांची  विल्हेवाट  लावण्यास मदत करणे.
१०. शासनाच्या आदेशांबाबत गावात दवंडी देणे.
११. लसीकरण मोहीमेत मदत करणे.
१२. अपघाती मृत्यू, आग, साथीचे रोग या प्रसंगी पोलीस पाटलांना मदत करणे.
१३. गन्हेगारांच्या हालचाली  पोलिसांना कळवणे.
१४. पोलीस पाटलाच्या अपरोक्ष  असलेल्या ग न्हेगारावर पहारा देणे.
१५. गावातील  अधिकारी  यांना जमीन महसूल  वसुलीस मदत करणे.
१६. गावात शासकीय कामासाठी आलेल्या अजिकार् यांना सहाय्य करणे.
१७. गावातील चावडी स्वच्छ ठेवणे आजण तेथे दिवाबत्ती  करणे.
१८. गावातील अजिकार् यांना त्यांच्या इतर शासकीय कामात मदत करणे.
१९. वरिष्ठ अधिकारी यांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे करणे.