MPSC Bharti 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 82 जागांसाठी भरती

MPSC Bharti 2023| महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 82 जागांसाठी भरती

           MPSC Bharti 2023 MPSC Recruitment 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 82 जागांसाठी भरती ,महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या कडून विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. एकूण 82 जागांसाठी भरती घेण्यात येत आहे. जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्याकडून Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .MPSC Bharti 2023 MPSC Recruitment 2023 Online अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 05 जून 2023. MPSC Bharti Recruitment 2023  :- ची शैक्षणिक पात्रता,अभ्यासक्रम ,निवड प्रक्रिया,ठिकाण,वयाची अट ,पगार,अर्ज दाखल करण्याची पद्धत या बद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे .जाहिरातीत दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचूनच आपला अर्ज दाखल करावा.

                                               MPSC Bharti 2023 MPSC Recruitment 2023

MPSC Bharti Recruitment 2023 सरळसेवा भरती
सरळसेवा भरती

             जाहिरात क्रमांक  :-   022/2023 ते 025/2023

  • एकूण भरावयाची पदे :- 82

  • पदांचे नाव व ईतर माहिती :- 

अ.क्र. जाहिरात क्रमांक पदाचे नाव एकूण पदे
1 022/2023 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुष संचालनालयातील आयुष संचालक,  गट-अ

1

2 023/2023 सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित, गट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

41

3 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

22

4 025/2023 गृह प्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील

18

    एकूण 

82

 

शैक्षणिक पात्रता :-

अ.क्र. पदाचे नाव शैषणिक पात्रता
1 वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुष संचालनालयातील आयुष संचालक,  गट-अ (i) महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट, 1961 मध्ये वेळोवेळी सुधारित केलेल्या वेळापत्रकाच्या भाग A, B किंवा C मध्ये नमूद केलेली पात्रता असणे आवश्यक आहे.  (ii) 10 वर्षे अनुभव.
2 सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित, गट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (i) B.A/B.Sc/B.Com/LAW  (ii) सामाजिक कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन पदव्युत्तर डिप्लोमा/पदवी.
3 समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समाज कल्याण विज्ञान( social science) किंवा सामाजिक कार्य (social work Graduate)पदवी.
4 गृह प्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील  (i) B.A/B.Sc/B.Com/LAW   (ii) शिक्षण पदवी   (iii) 05 वर्षे अनुभव.

 

वयाची अट :- 01 सप्टेंबर 2023 रोजी, [OBC/EWS/अनाथ: 05 वर्षे सूट]

पद क्रमांक वय मर्यादा(सूट)
1 19 ते 45 वर्षे
2 23 ते 38 वर्षे
3 20 ते 38 वर्षे
4 20 ते 38 वर्षे
  • पगार (वेतन) :-७ व्या वेतन आयोगानुसार

  • परीक्षा पद्धत :- मुलाखती द्वारे ( अर्ज संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल तर चाळणी परीक्षा घेण्यात येईल.)
  • लेखी परीक्षा स्वरूप :- मुलाखती द्वारे ( अर्ज संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल तर चाळणी परीक्षा घेण्यात येईल.)
  • निगेटिव्ह मार्किंग : होय (चाळणी परीक्षा असल्यास )
  • वेळ : 2 तास
  • अर्ज करण्याची पद्धत :- फक्त Online पद्धतीने

  • नियुक्तीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

  • फी :-

         1.  पद क्र.1 & 4: खुला प्रवर्ग: ₹719/-  [OBC/EWS/अनाथ: ₹449/-]

         2.  पद क्र.2 & 3: खुला प्रवर्ग: ₹394/-  [OBC/EWS/अनाथ: ₹294/-]

  •         

 

  • अर्ज सादर करतांना घ्यावयाची काळजी :-

  • सदर भरतीसाठी अर्ज हा फक्त online पद्धतीनेच सादर करायचा आहे.
  • आपला अर्ज दाखल करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी.
  • अर्ज सादर करतांना कागदपत्रे हे स्पष्ट दिसतील असे अपलोड करावे अन्यथा तुमचा अर्ज नारारण्यात येईल.
  • अर्ज दाखल करतांना जातीचे आवश्यक ते कागदपत्रे अपडेट ठेवावेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2023 आहे.
  • भरती संदर्भातील सविस्तर माहिती साठी  PDF जाहिरात वाचावी.

अभ्यासक्रम :-  सर्व पदांसाठी स्वतंत्र कळविण्यात येईल.

MPSC Bharti 2023 MPSC Recruitment 2023

About  Recruitment 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2023 बाबत

      भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार राज्य लोकसेवा आयोगाची निर्मिती करण्यात आलेली असून सदर आयोग हा वैधानिक आयोग आहे.ह्या आयोगामार्फत राज्यशासनाच्या विविध विभागातील गट क ते गट अ च्या पदांची भरती स्पर्धा परीक्षे सरळसेवे मार्फत  घेऊन उमेदवारांची निवड करण्यात येते. 

MPSC Bharati 2023 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) भरती बाबत सर्वसाधारण सूचना :-

1. पदे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी,पोलीस सब इन्स्पेक्टर ,तहसिलदार,सहायक राज्य कर आयुक्त,या अशा विविध पदांसाठी स्पर्धापरीक्षेमार्फत भरती केली जात असते.

2. पात्रता : प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगळी असते व ती संबधित जाहिरातीत नमूद असते.वयाची अट सुद्धा प्रत्येक पदा नुसार वेगळी असते.उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज सादर करावेत.

3. निवड प्रकिया  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती साठी लेखी,मुलाखत,व काही पदांसाठी शारीरिक चाचणी घेण्यात येत असते. सदर भरती परीक्षा वस्तुनिष्ठ वैकल्पिक पद्धतीने घेण्यात येत असते.चाळणी परीक्षेत निवड होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.

4. अर्ज दाखल करण्याची पद्धत : इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज MPSC Recruitment 2023 च्या अधिकृत website वरून अर्ज करावेत. उमेदवारांनी आपले आवश्यक ते कागदपत्र अपलोड करावेत व फी online तसेच offline पद्धतीने करता येते.

5. प्रवेश पत्र : प्रवेश पत्र हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत website वरून परीक्षेच्या ७ ते ८ दिवस अगोदर डाउनलोड करून घ्यावे लागतात.उमेदवारांनी आपले प्रवेश पत्र व ओळखपत्र परीक्षेला येतांना सोबत आणावे .

6. निकाल : संबंधित परीक्षेचा निकाल हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत website, वरून आपल्याला प्राप्त होईल त्यासाठी वेळोवेळी website ला भेट देणे आवश्यक आहे.तसेच कागदपत्र पडताळणीसाठी सुद्द्धा website वर येते.जाहीर करण्यात येते .