Police Patil Bharti | महसूल व वन विभागामार्फत ता.उमरेड, भिवापूर व कुही(नागपूर) येथे “पोलीस पाटील” पदासाठी भरती होत आहे.
- शैक्षणिक पात्रता :-
अ.क्र. | पदाचे नाव | शैषणिक पात्रता |
---|---|---|
1 | पोलीस पाटील | 10 थी पास |
वयाची अट :- अर्जदाराचे वय दि.29/05/2023 रोजी कमीतकमी 25 वर्षे व जास्तीतजास्त 45 वर्षे असावे
- पगार (वेतन) :- शाशकीय नियमानुसार
Police Patil Bharti 2023 ची परीक्षा पद्धती :-
- परीक्षा पद्धत :-
पदाचे नाव | परीक्षेचे स्वरूप |
पोलीस पाटील | लेखी परीक्षा (80 गुण) + तोंडी परीक्षा (20 गुण) एकूण 100 गुण |
- त्यानुसार सदर लेखी व तोंडी परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे निवडसूची तयार करुन निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे.
- निगेटिव्ह मार्किंग : नाही
- वेळ : 2 तास
परीक्षेचा दिनांक :-नंतर कळविण्यात येईल
अर्जाची पद्धत :- ऑनलाईन
अर्ज करण्याचा पत्ता :-अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारण्यात येतील.
- नियुक्तीचे ठिकाण : तालुका उमरेड, भिवापूर व कुही(नागपूर) यांच्या कार्यक्षेत्रातील रिक्त गावात
- परीक्षा शुल्क :- 300/- रुपये [आरक्षीत/आर्थीक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – 200/- रुपये]
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ: www.sdoumredpp.in
- जाहिरात :- येथे पहा
-
लेखी परीक्षा 10 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल यात सामान्य ज्ञान ,गणित,पोलीस पाटील चे अधिकार व कर्तव्य ,स्थानिक परिसरातील माहिती व चालू घडामोडी ई.विषयांचा समावेश असेल.
-
About Nagpur Police Patil Bharti 2023 भरती बाबत सर्वसाधारण सूचना –
पोलीस पाटील भरती, नियुक्ती ,कर्तव्य आणि कार्ये याबाबत महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम,१९६७ लागू आहे.
- 1. प्राप्त केलेल्या गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी अर्जदाराचे शैक्षणिक पात्रता व इतर संबंधित मुळ प्रमाणपत्र तपाणीसाठी मुलाखतीच्या दिवसी उपलब्ध करुन दयावी लागतील. अन्यथा तोंडी परिक्षेकरीता अर्जदाराचा विचार केला जाणार नाही.
- 2. लेखी परिक्षा, तोंडी परिक्षा, कागदपत्रे छाननी, प्रवेशपत्र वेळापत्रक व विविध सुचना उपविभागीय अधिकारी कार्यालय, मरेड, भिवापूर व कुही(नागपूर) येथे उपलब्ध करुन दिल्या जातील. भरती प्रक्रीयेतील माहिती / कार्यक्रमाबाबत अद्यावत व सजग राहण्याची तसेच प्रवेशपत्र प्राप्त करून घेण्याची जबाबदारी संपुर्णत: अर्जदाराची राहील.
- 3. लेखी परीक्षेला पात्र ठरलेला उमेदवार मुलाखतीस हजर नसेल तर त्यास अपात्र ठरविण्यात येईल.
- 4. अर्जदार शारिरीक दृष्टया सक्षम असल्याबाबतचे अधिक्षक ग्रामिण रुग्णालय यांचे अथवा वरिष्ठ वैद्यकीय अधिका-याचे प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील व अर्जदाराची पात्रता वैद्यकीय तपासणी अंतिच निश्चित करण्यात येईल.
- 5. उमेदवाराचे चारीत्र निष्कलंक असल्याबाबतचे संबंधित पोलीस स्टेशनचे चारीत्र प्रमाणपत्र पडताळणीचे वेळी सादर करणे आवश्यक राहील.
- 6. अर्जदाराचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसावा त्याचप्रमाणे तो ईतर ठिकाणी पुर्णवेळ नौकरी करणारा नसावा तसेच तो स्थानिक स्वराज्यसंस्थेचा खाजगी किंवा निमसरकारी संस्थेचा सदस्य नसावा याबाबतचे रुपये 100/- च्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र, कागदपत्र पडताळणीच्यावेळी सादर करणे आवश्यक राहील.
- 7. अर्जदार स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे.
पोलीस पाटीलची महत्वाची कर्तव्य (महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम,१९६७ नुसार ) :-
जिल्हा दंडाधिकान्याच्या आदेशांस अधीन राहून पोलीस पाटील-.
- (1) त्याचे गाव ज्याच्या स्थानिक अधिकारितेत येत असेल अशा इतर कोणत्याही कार्यकारी दंडाधिकान्याच्या आदेशान्वये काम करील.
- (2) असा कार्यकारी दंडाधिकारी जी कोणतीही विवरणे आणि माहिती मागवील, ती विवरणे व माहिती पुरवील.
- (3) आपल्या गावातील अपराधांचे प्रमाण व ग्राम पोलिसांशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी याविषयी आणि गांवातील समाजाचे स्वास्थ्य व त्याच सर्वसाधारण परिस्थिती याविषयी अशा कार्यकारी दास नियमितपणे माहिती देईल.
- (4) कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने आपली कर्तव्ये पार पाडण्याच्या कामी मदत मागितली असता अशा सर्व पोलीस अधिकाऱ्यांना त्याच्या अधिकारात असेल त्याप्रमाणे सर्व प्रकारची मदत देईल.
- ( 5) दंडाधिकान्याकडून किंवा पोलीस अधिकाऱ्याकडून त्यास जे आदेश व अधिपत्रे देण्यात येतील त्या सर्व आदेशांचे व अधिपत्रांचे पालन व कार्यन्वयन तत्परतेने करील.
- (6) सार्वजनिक शांततेस ज्या गोष्टीमुळे धोका पोहोचेल अशा गोष्टीविषयी गुप्तपणे माहिती गोळा करील व ती ठाणे अधिकान्यास कळवील.
- (7) आपल्या गावाच्या हद्दीत अपराध घडू नये म्हणून किंवा लोकांस उपद्रव होऊ नये म्हणून बंदोबस्त करील व आपल्या गावाच्या हद्दीतील गुन्हेगारांचा शोध करून त्यांना न्यायासनासमोर हजर करील.
- (8) या अधिनियमाच्या इतर तरतुदींन्वये विनिर्दिष्ट करण्यात येतील आणि राज्य शासनाकडून या बाबतीत सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे वेळोवेळी विनिर्दिष्ट करण्यात येतील, अशी इतर कर्तव्ये पार पाडील.